चिंतामणी देशमुख - लेख सूची

दामोदर धर्मानंद कोसंबीः संक्षिप्त जीवनपट

‘भारतातील सर्वांत स्फूर्तिदायी इतिहासकार’ असे ज्याचे वर्णन जॉन की (John Keay) हे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ करतात, आणि भारतीय इतिहास विद्येला एक नवा पॅराडाईम त्यांनी मिळवून दिला’ असे प्रा. रोमिला थापरसारख्या इतिहाससंशोधक मानतात. त्या दामोदर धर्मानंद कोसंबींचे हे जन्मशताब्दी वर्ष. इतिहाससंशोधक म्हणन कोसंबी विशेष प्रसिद्ध असले तरी गणित आणि संख्याशास्त्र ह्या विषयातील त्यांचा अधिकारही मोठा होता. त्यांच्या …

धर्म आणि विज्ञान

मानवजातीच्या हातून ज्या कृती व विचार घडून आलेले आहेत त्या सर्वांचा संबंध सदोदित खोलवर जाणवणाऱ्या मानवी गरजांचे समाधान करणे व वेदनांचे शमन करणे यांच्याशी निगडित राहिलेला आहे. पारमार्थिक चळवळी व त्यांची वाढ समजून घ्यायची असेल तर ही गोष्ट आपण सतत ध्यानात ठेवली पाहिजे. मानवाचे सर्व कष्ट व सर्जनशीलता यांच्यामागील मूलस्रोत हा मानवी भावना व इच्छा-आकांक्षामध्ये …

आइनस्टाईन: उत्कट साहसवीर

‘ते आमचे प्राध्यापक आइनस्टाइन’ टॅक्सीचालकाने ममत्वपूर्ण अभिमानाने सांगितले. उर्मटपणासाठी कुप्रसिद्ध असलेल्या अमेरिकन टॅक्सीचालकांच्या जातीत हे दुर्मिळच होते. डिसेंबर १९४८ मधील एका मरगळलेल्या दुपारी प्रिन्स्टनमधील पदपथावरून उत्साहाने चालत असेल्या व्यक्तीकडे त्याचा रोख होता. आता पांढरी आणि विरळ झालेली ती सुप्रसिद्ध केसांची आयाळ त्या हवेतही हॅटखाली झाकलेली नव्हती. अंगावर शर्ट-आणि-टायऐवजी खलाशी वापरतात तशी विणलेली जर्सी होती, आणि …

चोम्स्कींची रसेल-भाषणे

प्रा. नोम चोम्स्की (जन्म १९२८) हे अमेरिकन भाषावैज्ञानिक दोन कारणांसाठी जगप्रसिद्ध आहेत. भाषाविषयक त्यांच्या संशोधनाने या क्षेत्रात क्रांतिकारक पॅरॅडाइम बदल घडवून आणला, तसेच १९६०-७० च्या दशकात व्हिएतनाम युद्धकाळात अमेरिकेतील विद्यार्थ्यांनी आपल्या सरकारच्या विरोधात जो उठाव केला त्याला मार्गदर्शन करण्यासाठीही ते उभे राहिले. तेव्हापासून सातत्याने त्यांनी उदारमतवादी, लोकशाहीवादी भूमिकेतून डाव्या चळवळीचे वैचारिक प्रवक्ते म्हणून कामगिरी बजावली …

शिडी

प्रत्येक व्यक्तीची क्षमता मर्यादित असते. ती शक्य तितकी टोकापर्यंत ताणणे, आपली दृष्टी जास्तीतजास्त विस्तारणे हे त्यांचे संशोधनाचे ध्येय होते. या दृष्टिकोनाचे प्रतीक असे एक छायाचित्र त्यांच्या खोलीच्या भिंतीवर टांगलेले होते. पिएरो बोरेलो या चित्रकाराच्या ‘एका व्यक्तीचे स्वतःचे दर्शन (शिडीवरील माणूस)’ या चित्राची ती प्रत होती. यात एक मोठी भिंत असून तिला टेकविलेल्या शिडीवर एक माणूस …

आधुनिक विज्ञान: स्वरूप आणि स्थिती

विसाव्या शतकात कितीतरी प्रचंड महत्त्वाच्या घडामोडी झाल्या आणि जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. दोन महायुद्धे, रशियन क्रांतीचा उदयास्त, जुना वसाहतवाद संपुष्टात येऊन झालेली नवस्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती, आणि चीनमधील क्रांती वगैरे. परंतु 21 व्या शतकात प्रवेश करताना जाणवते की या घडामोडी कमी लेखणे शक्य नसले तरी आर्थिक, सामाजिक क्षेत्रांत घडून आलेल्या प्रचंड बदलात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे …

विज्ञानाचे सामाजिक व्यवहारातील स्थान आणि वैज्ञानिकांचे सामाजिक उत्तरदायित्व

विज्ञानाचे समाजव्यवहारातील स्थान काळानुसार बदलत गेलेले आहे, आणि त्याला अनुरूप असा बदल वैज्ञानिकांच्या सामाजिक स्थानात व वर्तणुकीतही झाला आहे. आधुनिक विज्ञानाने सतराव्या-अठराव्या शतकात युरोपात मूळ धरले आणि युरोपीय व्यापारी, मिशनरी व वसाहतवादी यांच्या बरोबर हे विज्ञानही जगभर फैलावले. आज आपण विसावे शतक हे विज्ञानाचे शतक होते असे छातीठोकपणे सांगू शकतो. परंतु एकोणिसाव्या शतकापर्यंत विज्ञानाचे समाजव्यवहारातील …